राजोडी ते ध्यानाश्रम रस्ता खड्डेयुक्त

By Admin | Updated: April 29, 2016 04:52 IST2016-04-29T04:52:44+5:302016-04-29T04:52:44+5:30

राजोडी गावातील ध्यानाश्रम पासून ते राजोडी चार रस्त्यापर्यंतच्या वसई - विरार महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचे काम रखडलेले आहे.

Dhadnashram road from rajodi to Dhaynashram | राजोडी ते ध्यानाश्रम रस्ता खड्डेयुक्त

राजोडी ते ध्यानाश्रम रस्ता खड्डेयुक्त

विरार : येथील पश्चिम भागातील राजोडी गावातील ध्यानाश्रम पासून ते राजोडी चार रस्त्यापर्यंतच्या वसई - विरार महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या रस्त्याचे काम रखडलेले आहे. हा रस्ता खूप अरुंद आहे. या रस्त्यावर खूप खडडे् पडले आहेत. त्यामुळे मोठी वाहने आली की वाहतूककोंडी होते. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ध्यानाश्रमपर्यंत एमएमआरडीएच्या माध्यमातून व आमदार विवेक पंडित यांच्या आमदार निधीतून रुंदीकरण होऊन या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. परंतु आता फक्त ५०० ते ६०० मीटर रस्त्याचे काम बाकी आहे. (वार्ताहर)

Web Title: Dhadnashram road from rajodi to Dhaynashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.