सुरक्षा महामंडळाचे डीजी पद रिक्त राहील

By Admin | Updated: October 1, 2015 03:22 IST2015-10-01T03:22:18+5:302015-10-01T03:22:18+5:30

पोलीस महासंचालकांसह अन्य दोन डीजीच्या पदांचे खांदेपालट करण्यात आले असताना रिक्त राहिलेल्या सुरक्षा महामंडळाच्या प्रमुख पदावर पुढील चार महिने

DG's post of security corporation will remain vacant | सुरक्षा महामंडळाचे डीजी पद रिक्त राहील

सुरक्षा महामंडळाचे डीजी पद रिक्त राहील

जमीर काझी, मुंबई
पोलीस महासंचालकांसह अन्य दोन डीजीच्या पदांचे खांदेपालट करण्यात आले असताना रिक्त राहिलेल्या सुरक्षा महामंडळाच्या प्रमुख पदावर पुढील चार महिने पूर्णवेळ अधिकारी असणार नाही. ३१ जानेवारीला या ठिकाणी पुण्याचे पोलीस आयुक्त के. के.पाठक यांची पदोन्नतीवर नियुक्ती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१९८२च्या बॅचचे डी. डी. पडसलगीकर हे डीजीच्या रिक्त पदासाठी पात्र असले तरी सध्या ते केंद्रात ‘आयबी’मध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर थेट १९८४च्या बॅचचे आयपीएस असलेले पुण्याचे आयुक्त के. के. पाठक हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांना पाच महिने झाल्याने तूर्तास डीजीची सहा पदे कार्यरत ठेवायची आणि पुढील वर्षी ३१ जानेवारीस जावेद निवृत्त झाल्यानंतर ते पद अपर महासंचालक दर्जाचे करण्यात येणार आहे. पाठक यांचे बढती देऊन नियुक्ती करण्यात येणार आहे.

Web Title: DG's post of security corporation will remain vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.