शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तिरुपतीच्या भक्तनिवासात भाविकांना मिळतेय सोलापुरी चादरींचीच ऊब...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:20 IST

देवस्थानच्यावतीने भक्तनिवासात राहणाºया भक्तांना पांघरुणाकरिता सोलापुरी चादरींचा वापर होत आहे

ठळक मुद्देदेवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजकांना फोन आणि ई-मेलवर चादरींचे आॅर्डर देते़उद्योजक देवस्थानच्या आॅर्डरप्रमाणे आकर्षक, रंगतदार, जाड आणि टिकाऊ चादरींची निर्मिती करतातचादरींच्या किनारपट्टीवर तिरुमला-तिरुपती देवस्थानचा शॉर्टकट नेम टीटीडी अशी छपाई केली जाते

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : सोलापुरात चादरीचे उत्पादन कमी झाले असले तरी तिची लोकप्रियता अद्याप कायम आहे़ देशाच्या काही भागात अद्याप सोलापुरी चादरींची ऊब जाणवते़ जगविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सोलापुरी चादरींना मोठी मागणी आहे़ देवस्थानच्या वतीने भक्तनिवासात राहणाºया भक्तांना पांघरुणाकरिता सोलापुरी चादरींचा वापर होत आहे़ सोलापुरी चादरी अधिक टिकाऊ, ऊबदार आणि बहुउपयोगी असल्याने देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातून चादरी खरेदी करत आहे, अशी माहिती टेक्स्टाईल उद्योजक प्रभाकर बुरा यांनी ‘लोकमत’ला दिली़.

तिरुमला तिरुपती देवस्थानात रोज लाखो भक्तगण भगवान बालाजींच्या दर्शनाकरिता येतात़ येथे भक्तांच्या निवासाकरिता हजारो खोल्यांची व्यवस्था आहे़ देवस्थानच्या भक्तनिवासात रोज हजारो भक्त थांबतात़ पर्वताखाली तिरुपती शहर आहे़ आणि पर्वतावर तिरुमला देवस्थान आहे़ या दोन्ही ठिकाणी भक्तांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे़ विशेष म्हणजे, पर्वतावर बाराही महिने थंडी असते़ पावसाचाही तडाका असतोच. त्यामुळे येथील थंडीपासून बचाव करण्याकरिता जाड आणि ऊबदार अशा सोलापूर चादरीची नितांत गरज असते़ येथील प्रत्येक खोलीत सोलापुरी चादर बघायला मिळते.

देवस्थानकडून डबलपेटी मयूरपंख चादरींना मागणी आहे. मयूरपंख चादरी आलटून पालटून वापरता येतात. येथील चादरी बहुउपयोगी आहेत़ पूर्वी हजारो चादरी येथून जायच्या़ आता ती संख्या कमी झाली आहे़तिरुपती येथील बहुतांश हॉटेलमध्येसुद्धा सोलापुरी चादरींचा वापर होतो़ सोलापुरातील पाच ते सहा चादरी उत्पादकांकडून तिरुमला-तिरुपती देवस्थान चादरी तयार करुन घेते, असे येथील उद्योजकांनी सांगितले.

एक विश्वासाचं नातं...- देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजकांना फोन आणि ई-मेलवर चादरींचे आॅर्डर देते़ येथील उद्योजक देवस्थानच्या आॅर्डरप्रमाणे आकर्षक, रंगतदार, जाड आणि टिकाऊ चादरींची निर्मिती करतात़ त्यात चादरींच्या किनारपट्टीवर तिरुमला-तिरुपती देवस्थानचा शॉर्टकट नेम टीटीडी अशी छपाई केली जाते़ ७० बाय ९० साईजच्या चादरीची किंमत साधारण अडीचशे ते तीनशे रुपये इतकी असते़ या चादरींचे आयुष्यमान किमान दहा वर्षे असते़ आॅर्डर आल्यानंतर येथील उद्योजक आकर्षक असे पॅकिंग करून कुरिअरद्वारे पाठवतात. आॅर्डर पोहोचताच देवस्थान उत्पादकांच्या खात्यात एनईएफटीद्वारे बिल अदा करते़ देवस्थान आणि येथील उत्पादकांमध्ये एक विश्वासाचं नातं तयार झालं आहे.

तेथेही आव्हाऩ़़- बुरा सांगतात, सोलापुरी चादरींचा वापर केवळ व्हीव्हीआयपी लोकांकरिता होतो़ सोलापुरी चादरी चांगल्या असल्याने त्याचा वापर केवळ एसी खोलीत होतो़ इतर साध्या खोलीत पानिपतच्या चादरींचा पांघरुणाकरिता वापर होतो़ पूर्वी सर्वच खोल्यात सोलापुरी चादरींचा वापर होत होता़ आता देवस्थानकडून पानिपतच्या चादरींनाही पसंती दिली जात आहे़ सोलापूरच्या तुलनेत पानिपतच्या चादरी स्वस्त असतात़ हलके असतात़ लहान मुलं आणि महिला पानिपतच्या चादरींना पसंती देतात़ विशेष म्हणजे, सोलापुरी चादरींचा वापर केवळ व्हीव्हीआयपी लोकांकरिता होतो़ व्हीव्हीआयपी लोकांनादेखील सोलापुरी चादरींची सवय झाली आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट