देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत
By Admin | Updated: February 16, 2017 20:30 IST2017-02-16T20:30:56+5:302017-02-16T20:30:56+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये झालेल्या प्रचारसभेत केली.

देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत
>ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 16 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीमध्ये झालेल्या प्रचारसभेत केली.
मुख्यमंत्र्यांनी गुंडांना क्लीन चिट देण्याचा कारखाना उघडला आहे. येत्या 23 फेब्रुवारीनंतर राज्याची परिस्थिती पूर्णपणे बदललेली असेल. या सरकारचा अंत जवळ आला असून मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री होतील, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
तसेच, शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या बंदीवरुन संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. सामनाची बंदी म्हणजे आगीशी खेळ असल्याचा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.