शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : 'मला अटक करण्याचा आदेश वरुन आला होता'; देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:30 IST

Devendra Fadnavis : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता पुन्हा फडणवीसांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले होते की, 'महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते.' यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी यांनी हे आरोप फेटाळून लावले. 

आता काय म्हणाले फडणवीस?दिल्ली दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वळसे पाटील यांच्या वक्तव्याबाबत सांगण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले की, मी अतिशय सत्य सांगितेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला कारागृहात टाकण्याचा प्रयत्न होता. याची सुपारी तत्कालिक मुंबईचे पोलिस कमिशन संजय पांडे यांना दिली होती. याची माहिती एकनाथ शिंदे यांनादेखील आहे.' 

यावेळी त्यांना तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटलांवर कुठलाही आरोप केला नाहीये. हा जो आदेश आला होता, तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरुन आलेला होता, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसल्याने सस्पेन्स वाढला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील