शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा 'हा' नवा उद्योग; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 17:43 IST

सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले

नंदूरबार - विश्वासघाताने तयार झालेल्या या सरकारने पहिला विश्वासघात अवकाळी पावसाने त्रस्त शेतकर्‍यांचा केला. त्यांना मदत दिली नाही. दुसरा विश्वासघात कर्जमाफीतून त्यांना वगळून केला आणि आता 10 रूपयांत भोजन देण्याचे सांगून त्यालाही अटी लावल्या. महाराष्ट्राला मुर्ख बनविण्याचा हा नवा उद्योग आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच विरले. आता 10 रूपयांत किती लोकांना भोजन याचे जिल्हाश: आकडेच दिले जात आहेत. संपूर्ण नंदूरबार जिल्हा मिळून केवळ 300 लोकांना हे जेवण मिळू शकेल असा आरोप त्यांनी केला. 

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी अनन्वित अत्याचार सहन केले. दोनवेळा जन्मठेप भोगणारे ते एकमेव स्वातंत्र्यसेनानी. ज्या कुटुंबाने राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अपमान शिवसेना कितीवेळा सहन करणार, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नंदूरबार जिल्ह्यांमधील सभांमध्ये बोलताना उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी अवमानजनक उदगार काढल्यानंतर शिवसेना गप्प होती. काल काँग्रेस पक्षाने एक पुस्तक वितरित केले. ज्या वीर सावरकरांनी देशासाठी संपूर्ण जीवन दिले, त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण त्यात करण्यात आले आहे. ते समलैंगिक होते, असे हे विकृत लिखाण आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे लिखाण करीत असाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी काँग्रेसला दिला. 

दरम्यान, वीर सावरकरांचा हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. वीर सावरकर हे या देशाचे आराध्य आहेत. शिवसेना सत्तेसाठी मूग गिळून बसली असली तरी आता त्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल. अशांचा नायनाट आता भारताची जनता केल्याशिवाय राहणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. धुळे जिल्ह्यात रवाना होण्यापूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दोन सभांना त्यांनी संबोधित केले. गरिब आणि आदिवासींसाठी गेल्या 5 वर्षांच्या काळात सरकारच्या वतीने केलेल्या कामांची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार