शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: "लज्जास्पद!!! देवेंद्र फडणवीसांनी 'ती' पातळी गाठली", पवारांबद्दलच्या वक्तव्यावरून NCP ने घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 12:01 IST

पहाटेच्या शपथविधीची शरद पवारांना कल्पना होती, असे फडणवीस म्हणाले होते

Devendra Fadnavis vs Sharad Pawar: २०१९च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असताना अचानक पहाटेच्या शपथविधीने साऱ्यांना आश्चर्यचकित केले. भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अचानक सरकार स्थापन केले. हे सरकार दीड दिवस चालले. या घटनेनंतर सुमारे ३ वर्षानंतर देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला.  '२०१९ मध्ये आम्ही घेतलेल्या शपथविधी संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती होती', असे ते म्हणाले. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी हे विधान रुचले नाही. त्याशिवाय, राष्ट्रवादीचे नेतेमंडळीही आता फडणवीसांवर खवळल्याचे दिसत आहे.

'२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. "देवेंद्र फडणवीस हे अजिंक्य आहेत असा भाजपचा दावा आहे, पण हा दावा पोकळ आहे. सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी माननीय शरद पवार साहेबांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या  गोपीचंद पडळकरांसारख्या लोकांची पातळी त्यांनी गाठली आहे. लज्जास्पद!!!" असे ट्विट करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

शरद पवार फडणवीसांच्या विधानावर काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन ते अशा प्रकारची विधानं करतील असं वाटलं नव्हतं,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

दोन वेळा विश्वासघात- फडणवीसांनी व्यक्त केली खंत

“माझ्यासोबत दोनवेळा विश्वासघात झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या आणि निवडून आले. प्रचार सभेत पंतप्रधान मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा उद्धव ठाकरे टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला आहे", असे फडणवीस म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार