शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:36 IST

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या.

Devendra Fadnavis on Ajit Pawar: नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा 24 वा वर्धापन दिन साजरा झाला. कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. या घोषणेनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. या वर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शनिवार(10 जून) रोजी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. शरद पवारांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात अजित पवार नाराज असल्याच्य चर्चा सुरू झाल्या. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाले फडणवीस?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, फडणवीस म्हणाले, 'शरद पवारांनी भाकरी फिरवली, असे म्हणतात. पण, त्यांच्या निर्णयाला भाकरी फिरविणे नाही, तर ही धुळफेक करणे म्हणतात. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय आहे', अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

अजित पवारांची प्रतिक्रियाशरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही, राज्य पातळीवर काम करणारा आहे. माझ्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. अलीकडे मिडिया माझ्या इतकं का प्रेमात पडलाय कळत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजीच्या बातमीचे खंडन केले आहे. मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय, असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस