शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis Maharashtra Budget: अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही भलताच अर्थ काढायचा; फडणवीसांच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 15:31 IST

Maharashtra Budget Updates: अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे म्हटले होते. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आणि महिलांना केंद्रात ठेवून विविध योजना जाहीर केल्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचे म्हटले होते. 

‘पंचामृत’ मध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी; महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास; भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास; रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा; पर्यावरणपूरक विकास हे असल्याचे फडणवीस म्हणाले. हे पाचही मुद्दे झाल्यानंतर यातील पंचामृताकडे वळतो असे फडणवीस म्हणाले. 

यावेळी फडणवीसांनी सभागृहातील गंभीर वातावरण निवळण्यासाठी एक वक्तव्य केले. मी शब्द जरा जपून वापरतोय, चुकून अमृताकडे वळतो म्हणालो तर तुम्ही तुम्ही भलताच अर्थ काढायचा, असे म्हटले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचे नाव अमृता असल्याने त्यांनी ही लिंक जोडली. 

अर्थसंकल्पात महत्वाचे काय...

गेल्या काही वर्षांपासून बळीराजा संकटात आहे. पिक विम्याची रक्कम भरूनही त्याला संकटे आल्यावर विमा मिळत नव्हता. यामुळे विमा नको पण विमा कंपन्यांना आवरा अशी परिस्थिती झाली होती. यावर शिंदे-फडणवीस सरकारने तोडगा काढला आहे. राज्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा मिळणार आहे. 

- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.- 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस