शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 09:08 IST

एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या उमेदवारीची घोषणा केली.

Devendra Fadnavis on Girish Mahajan : विधानसभा निवडणुकांसाठी काहीच दिवस उललेले असताना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला  जामनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते त्यांच्या पत्नीला मिळतील असेही  देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जामनेर येथे शिवसृष्टी व भीमसृष्टी स्मारक अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. गिरीशभाऊ तुम्ही यावेळी लढून घ्या, २०२९ मध्ये तुम्हाला तिकीट देणार नाही. २०२९ मध्ये साधना वहिनीच (गिरीश महाजन यांच्या पत्नी) निवडणूक लढणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. गिरीश महाजन यांच्या पत्नीची उमेदवारी थेट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक लढवावी. पण २०२९ मध्ये गिरीश महाजन यांना तिकीट न देता त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना उमेदवारी देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. मात्र, ते शक्य नसून गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मतं केवळ साधना महाजन याच घेवू शकतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"जामनेर तालुक्याचे शिल्पकार गिरीश महाजन यांनी गेल्या ३० वर्षात शहराचाच नव्हे तर जामनेर तालुक्याचा केलेला विकास हा वाखण्या जोगा आहे. त्यांनी एकदा ठरवले की, आपल्याला हे काम करायचे आहे. ते काम हाती घेतल्या नंतर ते पूर्ण झाल्या शिवाय ते स्वस्त बसत नाहीत. गिरीश महाजन हे साधेसुधे नसुन अस्सल हिर्‍यांसारखे आहेत. जामनेरकर हे पारखी आहेत आणि त्यांची पारख जामनेरकरांना आहे. तसेच गिरीश भाऊ महाजन हे फक्त उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरात येतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जामनेरकरांची असेल. त्यांना कोणीही येथे पराजीत करू शकत नाही. त्यांची कामे करायची सचोटी असल्याने महाजन यांना संकटमोचक म्हणून संबोधित केले जाते. त्यांना सर्वात जास्त मताधिक्याने विजयी करण्याची जबाबदारी जामनेरकरांची असेल," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनjamner-acजामनेर