शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 22:39 IST

Laxman Jagtap: तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते रुग्णवाहिकेतून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत प्रचंड मोठा विजय आम्ही प्राप्त करू शकलो. त्यांनी सातत्याने लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठीच प्रयत्न केला. तब्येत खराब असतानाही ते पीपीई किट घालून ऍम्ब्युलन्समध्ये झोपून मुंबईपर्यंत आले. ते रुग्णवाहिकेतून चाचपडत खाली उतरताच मुख्यमंत्रीसाहेब मी तुमच्याकरिता आलो, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले हे सांगताना देवेंद्र फडणवीस भावूक झाले. तसेच लक्ष्मण जगताप यांच्या नावाने शहरात विधी महाविद्यालय उभारण्याची आणि महापालिकेच्या कॅन्सर हॉस्पिटलला त्यांचे नाव देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. १४) सर्व राजकीय पक्षांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शोकसभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लक्ष्मण जगताप हे आपले लाडके आणि उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मोठ्या व्यक्तीची प्रचिती त्याच्या कार्यातून येते. शरीराने फिट असणारा सहकारी मित्र गमावला. संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही. आजाराच्या काळातही त्यांच्यात इच्छाशक्ती प्रचंड होती.

भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी मदत करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने मदत केली जाईल. त्याचप्रमाणे लक्ष्मण जगताप यांच्या नावाने शहरात विधी (लॉ) महाविद्यालय सुरू केले जाईल. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलला लक्ष्मण जगताप यांचे नाव दिले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा, सहकार्य करणारा नेता लक्ष्मण जगताप यांच्या रुपाने हरपल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.आमदार महेश लांडगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा