शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 17:25 IST

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई - माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक लाख रुपयांचा चेक श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द केला आहे.  यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होत आहे. यानिमित्त एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होत आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सर्व या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन राम मंदिरासाठी निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. या अभियानाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून 15 जानेवारीला सुरुवात झाली. हे देशव्यापी अभियान 27 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून तब्बल 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये, अशा स्वरुपात निधी संकलित केला जात आहे. निधी दिल्यानंतर, संबंधित व्यक्तीला पावती तसेच मंदिर आणि श्रीरामांचे एक चित्र देण्यात येते.

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसही अयोध्येला जाणार -मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान ते अयोध्येला जाणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला जायला हवे, मी देखील जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिद्धीला गेले आहेत.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा