शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:01 IST

कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरानंतर आम्ही जेवढी मदत केली, त्याच पद्धतीनं निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना मदत केली जावी.

मुंबई : राज्यात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. निसर्ग चक्रीवादळात ठाकरे सरकारनं केलेल्या तुटपुंज्या मदतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारनं केलेली मागणी अतिशय कमी आहे. कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरानंतर आम्ही जेवढी मदत केली, त्याच पद्धतीनं निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त लोकांना मदत केली जावी. 100 कोटींची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे. यावेळी ठाकरे सरकारकडे त्यांनी ५ प्रमुख मागण्याही केल्या आहेत. गेल्या वर्षी विशेष जीआर काढून एनडीआरएफ च्या निकषापेक्षा जास्त मदत केली होती. तशाच प्रकारची मदत केली पाहिजे. कोल्हापूरसाठी 4800 कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. कोल्हापूर अन् सांगली जिल्ह्यांना एकूण 6800 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. आता जाहीर केलेले 100 कोटी अतिशय तुटपुंजे आहेत. त्या रकमेत वाढ करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. एकट्या महाराष्ट्रात 35 हजार सॅम्पल टेस्ट करू शकतो, मात्र आपण फक्त 15 हजार टेस्ट करतोय. आज भारतात प्रतिदिन तीन लाख PPE किट तयार होतात. महाराष्ट्रातल्या फक्त 27 टक्के चाचण्या मुंबईची होत आहेत. मुंबईत कोरोनाच्या अधिक चाचण्या होणं आवश्यक आहे. ग्रामीण 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपये रोख, असे पैसे त्यावेळी पीडितांना दिले होते, आताही सरकारने त्याच पद्धतीने तातडीची मदत केली पाहिजे. जी घरं 15 टक्क्यांपेक्षा जास्त पडली आहे आपण त्यांना दुहेरी मदत केली पाहिजे. घरदुरुस्ती, जनावरांच्या गोठ्यांसाठी टपरी, छोटी दुकानं यांनाही सरकारने नव्याने उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे.

हेही वाचा

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ