शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

OBC Reservation: “गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:41 IST

OBC Reservation: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवारांनी आदरांजली वाहिली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांनी दिला गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळादिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

मुंबई: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवारांनी आदरांजली वाहिली. यासह एका Postal Envelope चे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपचे अनेक नेते डिजिटल माध्यमातून उपस्थित झाले होते. यावेळी भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच गोपीनाथ मुंडे असते, तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. (devendra fadnavis criticises thackeray govt over obc reservation)

दिवंगत नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे आज असते तर, ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न 

राज्यातील राजकारणासह गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केलेच. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्य उत्सुक असायचे. गोपीनाथ मुंडे यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस म्हणाले. 

लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?; भाजपचा सवाल 

ते जननायक आणि लोकनायक बनले

काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण त्याचे कार्य असामान्य असते. गोपीनाथ मुंडे त्यापैकीच एक होते. मुंडे यांना लोकनेता म्हटले जाते. ते जननायक आणि लोकनायक बनले. एका छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता, असे देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.   

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारOBC Reservationओबीसी आरक्षण