शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

देवेंद्र फडणवीसांना सभागृहात आठवला 'शोले'तील धर्मेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 17:07 IST

याआधी फडणवीसांनी शोले चित्रपटातील जेलरची आठवण करून देत शरद पवारांवर  टीका केली होती.

मुंबई - विधानसभेतील आजचा दिवस कोपरखळ्यांनीच गाजला. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसनेते नाना पटोले तर विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. या दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनप्रसंगी सभागृहात अनेक गंमतीदार किस्से घडले. यावेळी विरोधीपक्ष नेते फडणवीस यांना पुन्हा एकदा 'शोले' चित्रपट आठवला. त्यांनी स्वत:ची तुलना 'शोले चित्रपटातील नायक धर्मेंद्रशी केली. तर सत्ताधारी नेत्यांची तुलना अमिताभ बच्चनशी केली. 

देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्यावर सभागृहातील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सत्ताधारी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह फडणवीसांचे कौतुक करत टोलेही लागवले. या टोल्यांना फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिले. 

माझी अवस्था शोले चित्रपटातील धर्मेद्र सारखी झाली आहे. अमिताभ बच्चन जेव्हा धर्मेंद्रचं लग्न ठरविण्यासाठी जातो, त्यावेळी तो आपला मित्र धर्मेंद्रचं कौतुक करतो. पण त्यात त्याचा उद्देश लग्न मोडणे हाच असतो. त्याच पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून माझे कौतुक करण्यात आले आहे. असो. लोकशाही आहे. तो तुमचा अधिकार आहे, असल्याचं फडणवीसांनी नमूद केले.  

याआधी फडणवीसांनी शोले चित्रपटातील जेलरची आठवण करून देत शरद पवारांवर  टीका केली होती. नेते पक्ष सोडत असल्यामुळे पवारांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाले आहे. आधे इधर जाओ आधे उधर जावो बाकी मेरे पिछे आओ, असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला होता. त्यामुळे फडणवीसांना दुसऱ्यांदा शोले चित्रपट आठवल्याचे  दिसून आले.