शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:11 IST

PM Modi Devendra Fadnavis: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची धुळ्यात सभा पार पडली. यावेळी एक गंमतीशीर प्रसंग घडला. 

Maharashtra Election 2024 PM Modi: विधानसभा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदींची धुळ्यात प्रचारसभा झाली. या सभेत मोदींनी काँग्रेस-महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. दरम्यान, भाषण संपवत असताना मोदींनी सर्व उमेदवारांना उभं राहण्याची सूचना केली. यावेळी एक गंमतीशीर प्रसंग घडला. त्यामुळे फडणवीसांनाही हसू आवरलं नाही. 

धुळ्यात मोदींची प्रचारसभा झाली. भाषण संपवत असताना मोदी म्हणाले, "मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की, त्यांनी पुढं यावं. जे निवडणूक लढवत आहेत. जे उमेदवार आहेत."

धुळ्यातील सभेत काय घडलं?

पंतप्रधान मोदींनी पुढं येऊन उभं राहण्याची विनंती करताच धुळे जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार समोर येऊन उभे राहिले. यावेळी नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले देवेंद्र फडणवीस हे बसून होते. 

त्यांना बघून "देवेंद्रजी, आपणही निवडणूक लढवत आहात", असं म्हणत पंतप्रधान मोदी हसले. अचानक मोदींनी  नाव घेताच देवेंद्र फडणवीस उठले आणि पळतच समोर आले. हसत हसतच त्यांनी उपस्थित जनसमुदायाला हात जोडले. 

सर्व उमेदवारांशी मोदींचा संवाद

सर्व उमेदवार व्यासपीठावर समोरच्या बाजूला येऊन उभे राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्याकडे आले. उमेदवारांचे हात उंचावत त्यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. त्यानंतर मोदींनी देवेंद्र फडणवीस आणि इतर उमेदवारांशी संवाद साधला. बोलतच ते व्यासपीठावरून खाली उतरले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी