शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युतीचा 'नगारा' वाजला!; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर उधळली स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 07:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला, त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

- जगदीश राठोड

पोहरादेवी : भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून या दोन पक्षात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. त्यामधूनच दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केली; मात्र गेल्या महिनाभरापासून भाजपा-शिवसेनेचे संबंध मधूर होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. सोमवारी वाशिममधील पोहरादेवी येथे त्याचे पुन्हा प्रत्यंतर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळून संत सेवालाल महाराजांच्या पवित्र भूमित नगारा वाजविला, त्यामुळे भाजपा-सेना युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नगारारूपी वास्तूसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह  संत रामराव महाराज या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही नगारा वाजवून केल्याने ते कार्य चांगले व यशस्वी होते, असा प्रघात बंजारा समाजात आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य नगाºयाचं वादन केलं. एवढेच नव्हे तर यानंतर झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. राज्य चालविणे सोपी गोष्ट नाही, याची जाणीव मला आहे; मात्र तुम्ही उत्तम चालवित आहात, गेल्याच आठवड्यात आपण मराठा समाज बांधवांना आरक्षण दिले, त्याबद्दल तुमचे अभिनंदन, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मराठा समाजाची मागणी मान्य केली, आता माझा बंजारा समाज आहे, धनगर समाज आहे, यांच्याही मागण्याकडे लक्ष द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्यक्रम स्थळी येताना प्रोटोकॉलला बगल देत उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून कार्यक्रमस्थळ गाठले होते. उद्धव यांनी केलेल्या स्तुतीचा आदरपूर्वक स्वीकार करीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगितले. उद्धवजीसुद्धा या मंचावर आहेत अर्थात संपूर्ण राज्य सरकारच आज पोहरादेवीत आहे, त्यामुळे येथील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी एकमेकांचे कौतुक करून मैत्रीचा सेतु भक्कम केला. राज्यासोबतच वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेनेमध्ये ताणलेले संबंध सोमवारच्या कार्यक्रमाने मैत्रीत परावर्तीत झाल्याने पोहरादेवीत वाजलेले नगारे हे युतीचेच, अशी चर्चा यावेळी सुरू झाली. उद्धव यांनी काढली आजोबांची आठवण  संत सेवालाल महाराजांनी चांगल्या वैचारिक शिकवणीसह लढाऊ वृत्तीचे दर्शन घडविले. स्वाभिमानाने जगा लाचार होऊ नका ही त्यांचीच शिकवण. याच शिकवणीचा वारसा मला आजोबांपासून मिळाला आहे. आमच्या आजोबांनी टांग्याचे नंबर रंगविले मात्र भीक मागीतली नाही. स्वाभिमान शिकविला त्यामुळे संत सेवालाल महाराजाचाच वारसा आम्ही सारे चालवित आहोत असे उद्ध्व ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे