शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...तर उद्धव ठाकरेंसह आम्ही सर्वच चोर ठरतो का? देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 13:39 IST

'अशा प्रकारच्या व्यक्तीवर काय कारवाई केली पाहिजे, जनता हे सगळं पाहता आहे.'

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आज संजय राऊतांविरोधात सर्व सत्ताधारी आमदार एकवटले आहेत. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊतांच्या विधानाचे विधान परिषदेतही जोरदार पडसाद उमटले आहेत. राऊत यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला. संजय राऊत आम्हाला चोर मंडळ म्हणत आहेत. उद्धव ठाकरेदेखील याच सभागृहाचे सदस्य आहेत, मग आम्ही सर्वच चोर ठरतो का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना विचारला आहे.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटले जाते. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. न्यायालयाच्या विरोधात बोलल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे. आपल्याला हक्कभंग आयुध दिलं कशासाठी? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणतात, संजय राऊत साधे नेते नाहीत, राज्यसभेचे सदस्य आहेत. मोठ्या सभागृहाचे नेते असं करत असतील तर कसं सहन करणार? हक्कभंग घ्यायचा असेल तर घ्या नाही तर नका घेऊ. पण आम्ही याचानिषेध नोंदवला नाही तर उद्या हजारो संजय राऊत विधान मंडळाला चोर म्हणतील. सरकार म्हणून मी लोकांच्या भावना समजून घेतो. व्यक्ती कोणीही असो आमच्या पक्षातील असला तरी विधानमंडळाचा अपमान खपवून घेणार नाही. अशा प्रकारच्या व्यक्तीवर काय कारवाई केली पाहिजे हे जनता पाहता आहे, असंही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे