शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 23:20 IST

Devendra Fadnavis met Raj Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवतीर्थ या निवासस्थानी जात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र समोर आलेला नाही.

गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान, भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये काही मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. त्याला भाजपाच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान गाठत त्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिका तसेच आगामी निवडणुुकांसाठी युती होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र दोन्हीकडच्या नेत्यांनी त्याला कधीच दुजोरा दिला नाही. मात्र आता आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसे