कॉँग्रेसच्या काळात नाशिकमध्ये विकासकामे : अशोक चव्हाण
By Admin | Updated: February 19, 2017 16:40 IST2017-02-19T16:40:47+5:302017-02-19T16:40:47+5:30
कॉँग्रेसच्या काळात नाशिक शहरामध्ये विविध लोकाभिमुख विकासकामे करण्यात आली.

कॉँग्रेसच्या काळात नाशिकमध्ये विकासकामे : अशोक चव्हाण
नाशिक : कॉँग्रेसच्या काळात नाशिक शहरामध्ये विविध लोकाभिमुख विकासकामे करण्यात आली. गेल्या वीस वर्षांत नाशिकमध्ये कोणतीही दर्जेदार विकासकामे झाली नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक शहरातील वडाळारोडवर आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे सांगत त्यांनी जोरदार टीका केली. तसेच शिवसेना-भाजपा यांचा वाद हा केवळ देखावा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. दरम्यान, उन्हामुळे सुरूवातीला चव्हाण यांच्या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती; मात्र त्यानंतर हळुहळु गर्दी वाढू लागली आणि सभेला सुरूवात झाली.