चौदाशे कोटींचा विकास आराखडा
By Admin | Updated: March 6, 2017 01:08 IST2017-03-06T01:08:34+5:302017-03-06T01:08:34+5:30
कृषी, औद्योगिक, पर्यटन, रस्ते, आरोग्य आणि तीर्थस्थळांच्या विकासाच्या तब्बल १३८० कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

चौदाशे कोटींचा विकास आराखडा
पुणे : पुणे विभागातील कृषी, औद्योगिक, पर्यटन, रस्ते, आरोग्य आणि तीर्थस्थळांच्या विकासाच्या तब्बल १३८० कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. त्यातील ४३९ कोटी रुपयांची विकासकामे एकट्या पुणे जिल्ह्यातच होणार आहेत.
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या बैठकीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला. विधान भवनाच्या सभागृहात ही बैठक झाली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
।३८३ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी
पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत ४३९.०८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली असून, जिल्ह्यासाठी २८३.६६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. त्यातील मृदसंधारणासाठी १५ कोटी ७५ लाख रुपये, तर ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी १२ कोटी ८० लाख रुपये देण्यात येणार आहेत. रस्ते बांधकामासाठी २० कोटी ४० लाख रुपये, तर रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी २३ कोटी २० लाखांची तरतूद केली आहे.