नागपूरला बनविणार विकासाचे ‘मॉडेल’
By Admin | Updated: January 7, 2015 00:59 IST2015-01-07T00:59:33+5:302015-01-07T00:59:33+5:30
प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य असते. त्यातून विकास होत असतो. नागपूरचा सुंदर व स्वच्छ शहर असा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा

नागपूरला बनविणार विकासाचे ‘मॉडेल’
आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा संकल्प : जनसहभागावर भर
नागपूर : प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य असते. त्यातून विकास होत असतो. नागपूरचा सुंदर व स्वच्छ शहर असा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा संकल्प श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी व्यक्त केला. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शहर मोठे आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे शहर असल्याने येथील आयुक्तपद हे एक आव्हानच आहे. ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. शहराला मोठे करायचे आहे, अशी अधिकाऱ्यांसोबतच प्रत्येक नागरिकाची भावना असायला हवी.
नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याला सर्वप्रथम प्राधान्य राहील. लोकांची कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी प्रशासनात गुड गव्हर्नन्स आणण्याचा प्रयत्न राहील. यासाठी संवेदशीलता, समर्पित वृत्ती या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था आत्मनिर्भर असायला हव्या, त्यांनी आपल्या उत्पन्नातून प्रशासन व लोकांच्या गरजा भागवाव्या. विकासात्मक नवीन गुंतवणुकीसाठी राज्य व केंद्र सरकारची मदत घ्यावी. शहर विकासात नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका या दोन्ही संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. समन्वयातून, एकत्रित कृ तीतून विकासाला प्राधान्य राहील.
शहरातील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेऊ न यामागील कारणांचा शोध घेऊ न ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. मनपाचे उत्पन्न वाढावे, यासाठी नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व लोकांच्या सोयीची होईल, यासाठी प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
वर्धने यांच्याकडून सूत्रे स्वीकारली
मावळते आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडून श्रावण हर्डीकर यांनी सकाळी पदाची सूत्रे स्वीकारली. वर्धने यांच्याक डून त्यांनी विविध विभागासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी मनपातील अधिकारी उपस्थित होते.