शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करू - मुख्यमंत्री

By Admin | Updated: February 25, 2017 16:21 IST2017-02-25T15:07:15+5:302017-02-25T16:21:23+5:30

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

To develop the state through the inspiration of Shivrajaya - Chief Minister | शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करू - मुख्यमंत्री

शिवरायांच्या प्रेरणेतून राज्याचा विकास करू - मुख्यमंत्री

 ऑनलाइन लोकमत/ जयंत धुळप  

अलिबाग दि. 25 - शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यातील निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले 
 
राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदांमधील भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. या पार्श्वभूमीवर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांसमवेत शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावर दाखल झाले होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार तथा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रशांत ठाकूर, यांच्यासहीत अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री रायगड किल्ल्याकडे रवाना झाले. त्यानंतर रोपवेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे छत्रपतींचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या  सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि काही वेळ त्याठिकाणी थांबून शिवरायांचे स्मरण केले.          
 
 

Web Title: To develop the state through the inspiration of Shivrajaya - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.