बिहारचा विकास करा, महाराष्ट्रातील लोंढे थांबवा- नीतिशकुमारांचे 'राज'स्टाईल अभिनंदन

By Admin | Updated: November 8, 2015 13:35 IST2015-11-08T13:31:44+5:302015-11-08T13:35:23+5:30

नीतिशकुमार यांनी बिहारचा विकास करावा आणि महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत, असं सांगत राज ठाकरेंनी नीतिश कुमार, लालू यादव यांचे अभिनंदन केले.

Develop Bihar, stop violence in Maharashtra - Congratulations to 'Raj' style of Nitish Kumar | बिहारचा विकास करा, महाराष्ट्रातील लोंढे थांबवा- नीतिशकुमारांचे 'राज'स्टाईल अभिनंदन

बिहारचा विकास करा, महाराष्ट्रातील लोंढे थांबवा- नीतिशकुमारांचे 'राज'स्टाईल अभिनंदन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - बिहार निवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळून राज्यात त्यांचेच सरकार स्थापन होणार हे निश्चित झाल्यानंर सर्व पक्षीय नेत्यांनी नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांचे अभिनंदन करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मात्र नीतिश, लालू यांचे अभिनंदन करतानाच त्यांना एक सल्लाही दिला आहे. 'ब्रँड मोदीवर ब्रँड नीतिश'ने मिळवलेला हा विजय असून आता बिहारचा विकास करावा आणि महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत, असं राज यांनी म्हटलं आहे. 
'प्रादेशिक अस्मिता, विकास व सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे.  त्यांनी आता बिहारचा विकास इतक्या वेगाने करावा की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबतील तसंच बिहारचा विकास असा असावा की ज्यामुळे राज्यामधून बाहेर गेलेले बिहारीही परत घरी यावेत' असे सांगत राज यांनी नीतिश, लालूंचे पुन्हा अभिनंदन केले. 

Web Title: Develop Bihar, stop violence in Maharashtra - Congratulations to 'Raj' style of Nitish Kumar