तोतया महिला डीवायएसपी जेरबंद
By Admin | Updated: November 9, 2014 02:03 IST2014-11-09T02:03:55+5:302014-11-09T02:03:55+5:30
पोलिस अधिकारी म्हणून फसवणूक करणा:या 27 वर्षीय महिलेस परतूर पोलिसांनी शनिवारी मोठय़ा शिताफीने ताब्यात घेतले.

तोतया महिला डीवायएसपी जेरबंद
शेषराव वायाळ - परतूर (जि.जालना)
पोलिस अधिकारी म्हणून फसवणूक करणा:या 27 वर्षीय महिलेस परतूर पोलिसांनी शनिवारी मोठय़ा शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, ही महिला कधी सपोनि तर कधी डी. वाय. एस. पी. म्हणून सांगत नागरिकांना धाक धाकवत होती. या महिलेने बारा दिवस चक्क शासकीय विश्रमगृहातच मुक्काम ठोकला होता, अशी माहिती पोलिस सूत्रंनी दिली.
पूर्णा तालुक्यात बाणोगाव येथील सरिता रामराव कुलकर्णी (27) ही तरुणी मागील बारा दिवसांपासून शासकीय विश्रमगृहावर उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून वास्तव्यास होती. सध्या परतूर उपविभागात उपविभागीय पोलिस अधिका:याची जागाही रिक्त असल्याने कोणालाही शंका आली नाही. ही युवती कधी उपनिरीक्षक तर कधी डीवायएसपी असल्याचा दावा करीत होती. त्यामुळे तिच्याबाबत कुजबुज सुरु झाली. योगायोग असा महिलाच डीवायएसपी येणार असल्याची स्थानिक पोलिसांना माहिती कळाली होती. अचानक न सांगता ‘मॅडम’कशा काय आल्या हा प्रश्न पोलिसांना पडला.तेव्हा तिने विश्रमगृहातून मुक्काम हलविण्याचा प्रयत्न चालविला. मोंढा भागात एक रूमही किरायाने मिळवण्याचा खटाटोप करतेवळी घर मालकाच्या ओळखीने एका दुकानदाराकडून 18 हजारांचा फ्रिजही उधार घेतला. तेथेच शंका बळावली. उधार घेतलेला फ्रिज आपल्या खोलीवर न नेता इतरत्रच नेत असल्याचे घरमालकास आढळून आल्याने संशय दृढ झाला. यातच पो कॉ. अण्णासाहेब लोखंडे यांनी विश्रमगृहावर जाऊन सदर डीवायएसपीची चौकशी केली असता, ओळखपत्र न दाखवता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. व तेथून पसार झाली. पो कॉ लोखंडे यांनी तात्काळ सतर्कता दाखवून तिचा पाठलाग करती तिला ताब्यात घेतले. घरमालक प्रभाकर शामराव ढोबळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्यादही दिली.