10 लाखांच्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट

By Admin | Updated: July 2, 2017 16:51 IST2017-07-02T16:51:02+5:302017-07-02T16:51:02+5:30

28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला

Destruction of 10 million narcotics stocks | 10 लाखांच्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट

10 लाखांच्या अंमली पदार्थांचा साठा नष्ट

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 2 - गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध भागात जप्त केलेली 28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री हिंगणा परिसरात हा साठा नष्ट केला.

तहसील, इमामवाड़ा, एमआयडीसी अजनी, सक्करदरा, कलमना, यशोधरानगर, जरीपटका, गिट्टीखदान, प्रतापनगर, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचे अंमली पदार्थ पकडले. ठराविक मुदतीननंतर ते नष्ट केले जातात. तत्पूर्वी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी तीन पोलीस उपायुक्तांची समिती निर्माण केली होती. त्यात उपायुक्त संभाजी कदम (गुन्हे शाखा), उपायुक्त सुहास बावचे ( प्रशासन) आणि उपपायुक्त श्वेता खेडकर (ईओडबल्यू) यांचा समावेश होता.

या अधिका-यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची शहानिशा केल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी नियमावली तयार करून दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहका-यांनी हिंगणा परिसरात 28 ग्रॅम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 900 ग्रॅम चरस असा 9 ते 10 लाख रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जाळून नष्ट केला.

Web Title: Destruction of 10 million narcotics stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.