मुंबईत ‘एमडी’ ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त
By Admin | Updated: July 1, 2015 02:28 IST2015-07-01T02:28:31+5:302015-07-01T02:28:31+5:30
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री मंगळवारी ओशिवरा येथील एमडी ड्रग या अत्यंत घातक अमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला.

मुंबईत ‘एमडी’ ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त
मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री मंगळवारी ओशिवरा येथील एमडी ड्रग या अत्यंत घातक अमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला. एटीएसच्या चारकोप पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी चौघांना अटक केली.
ओशिवरा येथील कारखान्यात तयार झालेले व विक्रीसाठी तयार असलेले तब्बल १५१.५ किलो एमडी ड्रग एटीएस अधिकाऱ्यांनी हस्तगत केले. त्याची किंमत ३० कोटी असल्याचे एटीएसने सांगितले. महाराष्ट्रात एटीएसने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ओशिवरा येथील भाऊ तातोबा तोरस्कर मार्गावरील एकदंत इमारतीच्या ५०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये एमडी ड्रगचा कारखाना सुरू होता. सचिन दिलीप बागुल (२९), साजिद युसूफ इलेक्ट्रिकवाला (४१), चंद्रकांत कृष्णा काताडे (३२) आणि राहुल रमेश साळुंखे (२८) यांना संशयास्पद हालचालींमुळे ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले. (प्रतिनिधी)