वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी

By Admin | Updated: March 6, 2017 03:30 IST2017-03-06T03:30:52+5:302017-03-06T03:30:52+5:30

वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवर असलेल्या अनेक व्हॉल्वमध्ये लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते

Destroy Rajasthan daily on Vasaiat water | वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी

वसईत पाण्याची रोज राजरोस नासाडी


वसई : वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनवर असलेल्या अनेक व्हॉल्वमध्ये लिकेज असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते आहे.
या परिसरातील अनेक भागात आजही पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. अनेक ठिकाणी टँकरनेच पाणी पुरवठा केला जात आहे. असे असतांना महापालिकेकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर व्हॉल्व आहेत. त्यातील अनेक व्हॉल्वर लिकेज आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरु असते. नालासोपारा शहर ते हायवे रस्त्यावर संतोषभुवन पासून पुढे लिकेज व्हॉल्वमधून पाणी भरण्यासाठी रात्रंदिवस रांगा लागलेल्या पहावयास मिळतात. हिच परिस्थिती वसई स्टेशन ते हायवे वरील रस्त्यालगत पहावयास मिळते.
धक्कादायक बाब म्हणजे ( सोबत असलेल्या फोटोतील ठिकाण) वसई रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर पूर्वेच्या बाजूला असलेल्या पाईप लाईनवर एक व्हॉल्व आहे. हा व्हॉल्व अग्निशमन दलाला आणिबाणीच्या काळात गरज भासल्यास पाणी भरता यावे यासाठी बनवण्यात आला आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुुरु आहे. याठिकाणी पाणी भरण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत लोक त्याचा वापर करतात. ही पाईपलाईन मुख्य रस्त्यालगत आहे. येथून अधिकारी ये-जा करीत असतात, असे असतांनाही पाणी गळती रोखली जात नाही.

एकीकडे करदात्यांवर पाणी कपात लादणाऱ्या वसई-विरार महापालिकेच्या पाणी विभागाकडून ही पाणी गळती तातडीने रोखण्यासाठी ठोस असे उपाय योजले जात नसल्याने वसईकरांचे हजारो लिटर पाणी गेले अनेक महिने वाया जाते आहे.
वसई पूवेकडील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाइपलाईनवरील व्हॉल्व मध्ये गळती असल्याने पाणी वाया जात असून लोक त्याठिकाणी कपडे धूत असतात.

Web Title: Destroy Rajasthan daily on Vasaiat water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.