शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

नऊ आमदार असतानाही दि. बा. पाटील झाले होते विरोधी पक्षनेते; विधानसभेत यंदा विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? यावरून तर्कवितर्क सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 08:48 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान २८ आमदार असायला हवेत, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच नसेल, असे म्हटले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाचे महाराष्ट्रात किमान २८ आमदार असायला हवेत, असा नियम असल्याने यावेळी विरोधी पक्षनेताच नसेल, असे म्हटले जात आहे. अशात शेकापचे केवळ नऊ आमदार असतानाही ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, ही बाब समोर आली आहे. मविआत काँग्रेस, उद्धवसेना वा शरद पवार गट यापैकी यंदा कोणालाही २८ जागा मिळालेल्या नाहीत.   

 विधानसभेत २० किंवा त्याहून कमी आमदार, तरीही झालेले विरोधी पक्षनेते        कालावधी    एकूण     नाव    पक्ष    पक्षाचे एकूण         दिवस            आमदार        १)    १९६२ ते १९६७    २१९०    कृष्णराव नारायणराव धुळप    (शेकाप)    १५२)    १९६७ ते १९७२    २१९१    कृष्णराव नारायणराव धुळप    (शेकाप)    १९३)    ०७ एप्रिल १९७२ ते जुलै १९७७    १९४१    दिनकर बाळू पाटील     (शेकाप)    ७४)    १८ जुलै १९७७ ते फेब्रुवारी १९७८    २२५    गणपतराव अण्णासाहेब देशमुख    (शेकाप)    १३५)    १७ डिसेंबर १९८१ ते २४ डिसेंबर १९८२    ३७३    बबनराव दादाबा ढाकणे    (जनता पार्टी)    १७६)    २४ डिसेंबर १९८२ ते १४ डिसेंबर १९८३    ३५६    दिनकर बाळू पाटील    (शेकाप)    ९७)    १४ डिसेंबर १९८६ ते २६ नोव्हेंबर १९८७    ३४७    निहाल अहमद     (जनता पार्टी)    १७८)    २७ नोव्हेंबर १९८७ ते २२ डिसेंबर १९८८    ३९१    ॲड. दत्ता नारायण पाटील    (शेकाप)    १३९)    २३ डिसेंबर १९८८ ते १९ ऑक्टोबर १९८९    ३००    मृणाल केशव गोरे    (जनता पार्टी)    २०१०) २० ऑक्टोबर १९८९ ते ३ मार्च १९९०    १३५    ॲड. दत्ता नारायण पाटील    (शेकाप)    १३

न्यायालयाचे निर्णय अन् ‘मावळणकर रुल’विधानमंडळाचे दीर्घ काळ सचिव राहिलेले अनंत कळसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत रुलिंग दिलेले होते. त्याला ‘मावळणकर रुल’ असे म्हणतात. त्यांनी असे निर्देश दिले होते की, सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या एक दशांश इतकी संख्या विरोधी पक्षनेतेपदासाठी असावयास हवी. याच मावळणकर रुलचा आधार घेत २०१४ ते २०२४ पर्यंत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी विशिष्ट आमदार/खासदार संख्या असलीच पाहिजे, असे न्यायालयाचे निकालही आहेत.

नियम कुठे आहे दाखवा? उद्धवसेनेचे आव्हानउद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज ज्या नियमांनुसार चालते त्यात विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काहीही निकष नाहीत. हा २८ चा आकडा कोणी आणि कुठून आणला? नियमात तसे काहीच नाही. तरीही कोणी दावा करत असतील तर त्यांनी नियम दाखवावा.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभा