शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतरही सोशल मीडियात उदयनराजेंची 'ही' ओळख कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 13:44 IST

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपाच्या उदयनराजेंचा पराभव केला.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्या प्रमाणात मेगाभरती करण्यात आली. अनेक विरोधी पक्षाचे नेते भाजपाच्या गोटात सामील झाले. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. 

उदयनराजेंनी भाजपा प्रवेश केल्यामुळे सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शरद पवारांनी उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सुरुवातीला उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी त्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे विश्वासू शिलेदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. 

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपाच्या उदयनराजेंचा पराभव केला. मात्र त्यानंतरही आजतागायत उदयनराजे भोसले यांच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर अकाऊंटवर त्यांची ओळख लोकसभा सदस्य म्हणूनच आहे. उदयनराजे या दोन्ही अकाऊंटवर सक्रीय असतात. त्यांची शेवटची पोस्ट २८ नोव्हेंबरची आहे. 

उदयनराजे यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला होता. मात्र उदयनराजेंचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल असं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच या बाबतचे सूतोवाच केले होते.  खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेत पुनर्वसन करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार राज्यात पद मिळाले नाही तर राज्यसभेचे सदस्यत्व उदयनराजेंना मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते.

तसेच उदयनराजेंना भाजपा राज्यसभेवर घेणार असून कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंवर अन्याय होणार नाही, पक्ष योग्य सन्मान करेल असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे लोकसभेत पराभव होऊन राज्यसभेत सदस्य म्हणून गेल्यास शरद पवार आणि ते एकाच सभागृहाचे सदस्य होतील.   

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMember of parliamentखासदार