शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:27 IST

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे, अशा सूचना अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळोवेळी दिल्या होत्या.

Deputy CM Sunetra Ajit Pawar News: स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. 

ऊसतोड कामगारांच्या मुलांची शिक्षणाबाबतची आस्था वाढीस लावून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी "संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना" सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या ४१ तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी ४१ व मुलीसाठी ४१ अशी एकूण ८२ (प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुलींसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित ६२ शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे

या योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ (मुलांचे १ व मुलीचे १) प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता) अशी एकूण २२ शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींनी शिकले पाहिजे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे असे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न होते.त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि या मुला- मुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी पाठपुरावा केला आणि ते पालकमंत्री असताना अनेक ठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्या होत्या.सारथी संस्थेच्यावतीने मराठा समाजातील मुलांसाठी विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहांचे दर्जेदार बांधकाम करावे अशा सूचना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना वेळोवेळी दिल्या होत्या, अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. 

दरम्यान, ही सर्व शासकीय वसतिगृहे शासकीय इमारतीत सुरू करावयाची आहेत. सद्यस्थितीत केवळ ३ ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाल्या असून त्याठिकाणी वसतिगृहांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरीत १९ वसतिगृहांपैकी ११ जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. यामध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी २ (मुलांसाठी १ व मुलींसाठी १) आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Funds Approved for Beed's Migrant Sugarcane Workers' Children Hostels

Web Summary : ₹159 crore sanctioned for 11 hostels in Beed for sugarcane workers' children under the Bhagwan Baba scheme. Deputy CM Sunetra Pawar announced the approval, fulfilling Ajit Pawar's vision for accessible education.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड