Deputy CM Eknath Shinde News:इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात आखातात अनेक आघाड्यांवर पसरलेले दिसून आले. अनेक देशांमधील विमान उड्डाने रद्द झाल्यामुळे विविध ठिकाणी हजारो भारतीय अडकून पडले आहेत. यातच राठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार काही दिवसांपूर्वी लंडनला निघाला होता. अभिनयचे विमान लंडनला न जाता कुवेतमध्येच उतरले आणि तो तिथेच अडकला असल्याची माहिती विशाखाने व्हिडीओ शेअर करत दिली आहे. तसेच अभिनयला परत आणण्यासाठी विनंती केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेतली आणि अभिनयला सुखरूप परत आणणार असल्याचे सांगितले.
विशाखा सुभेदार मुलाच्या काळजीमुळे अस्वस्थ झाली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने संपूर्ण परिस्थिती सांगितली. ती म्हणाली की, नमस्कार! मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र कुवेतमध्ये lay over असल्यामुळे त्याचे फ्लाईट तिथे उतरवण्यात आले. गेले चार दिवस एअर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहित आहे विमाने रद्द करण्यात आली आहे. माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. तो स्वत: तिथे अनुभवतोय. तिथे हल्ले होत आहेत. या व्हिडिओनंतर एकनाथ शिंदे यांनी विशाखा सुभेदारशी संपर्क साधला.
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा लंडनला जायला निघाला असता युद्धजन्य परिस्थितीमुळे कुवेतच्या विमानतळावर अडकला आहे. याबद्दल व्हिडिओद्वारे विशाखा यांनी सरकारकडे मदतीची याचना केली होती. या व्हिडिओची तत्काळ दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गेठे यांनी अभिनय याच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनीही विशाखा सुभेदार यांच्याशी फोनवरून संवाद साधून आमचे अधिकारी अभिनयच्या संपर्कात असून तो सध्या आहे त्या हॉटेलमध्ये त्याची राहण्याची सोय केली असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मंडळाचे डॉ. पैठणकर यांनीही त्यांच्या लोकांना फोन करून त्याच्याशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे. यासोबतच जशी विमानसेवा पूर्ववत होईल तसे त्याला पुन्हा मुंबईत सुखरूप आणण्यात येईल असेही शिंदे यांनी विशाखा यांना सांगून त्यांना याबाबत आश्वस्त केले.
दरम्यान, एअरलाईनने आत्ता त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. इंडियन अँबेसीने व्यवस्था केली आहे. पण आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. दुबईच्या लोकांना परत आणले गेले तसेच कुवेतमध्येही भारतीये अडकलेत त्यांना परत आणावे. ही माझी कळकळीची विनंती आहे. अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची मायदेशी वाट बघत आहे. लवकरात लवकर त्यांना परत आणा, त्यांची काळजी घ्या एवढीच विनंती आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी विनंती विशाखा सुभेदारने केली आहे.
Web Summary : Amidst Middle East tensions, actress Vishakha Subhedar's son is stranded in Kuwait. DCM Eknath Shinde has assured her that authorities are assisting him and ensuring his safe return to Mumbai once flights resume. The government is providing support and monitoring the situation.
Web Summary : मध्य पूर्व में तनाव के बीच, अभिनेत्री विशाखा सुभेदार का बेटा कुवैत में फंसा हुआ है। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उसे आश्वासन दिया है कि अधिकारी उसकी सहायता कर रहे हैं और उड़ानें फिर से शुरू होने पर मुंबई में उसकी सुरक्षित वापसी सुनिश्चित कर रहे हैं। सरकार सहायता प्रदान कर रही है और स्थिति की निगरानी कर रही है।