Deputy CM Eknath Shinde News: पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानातील जनता माफ करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवतील. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करी जवानांनी उत्तर दिले. तरीही काँग्रेसकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. काँग्रेसचे हे देशप्रेम नाही तर पाकिस्तान प्रेम उतू चालले आहे. ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे यांचे नेते खऱ्या अर्थाने गद्दार आणि देशद्रोही आहेत, असा पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानाचा निषेध एकनाथ शिंदे यांनी केला.
राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे थेट जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. अशा प्रकारच्या विधानांचा जाहीर निषेध करतो. लष्कराला सेल्यूट करतो. पंतप्रधान मोदी यांचेही अभिनंदन करतो. त्यांनी सांगितले की, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. याला म्हणतात, देशभक्ती. काँग्रेसने अशा प्रकारची विधाने केली, त्यांची कबर जनता खोदल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल
देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल, असा थेट, प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला.
ही टीका देश प्रेमातून नाही, तर पाकिस्तान प्रेमातून होत आहे
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ अचूकपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई अत्यंत प्रिसाईज असून कोणतेही नागरी नुकसान झाले नाही. या कारवाईमुळे भारताची लष्करी ताकद आणि राजकीय इच्छाशक्ती जगासमोर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे. या संपूर्ण मोहिमेत लष्करी जवानांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हा संदेश मोदी सरकारने पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला दिला आहे. मात्र, या शौर्यपूर्ण कारवाईनंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये देश विघातक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ही टीका देश प्रेमातून नाही, तर पाकिस्तान प्रेमातून होत आहे. काँग्रेस नेत्यांची विधाने पाकिस्तानमध्ये हेडलाईन बनत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.
दरम्यान, २६/११ च्या वेळी काँग्रेस सरकारने जर सडेतोड उत्तर दिले असते, तर आज देशाला पुन्हा पुन्हा अशी किंमत मोजावी लागली नसती. पाकिस्तानविरोधातील ही कारवाई संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाशी जोडलेली आहे. देश, लष्कर आणि पंतप्रधानांविरोधात गरळ ओकणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांच्या हत्येचे जशास तसे उत्तर भारतीय लष्कराने दिले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Web Summary : Eknath Shinde slams Congress for questioning 'Operation Sindoor,' calling it pro-Pakistan and treasonous. He defends the army's action and PM Modi's stance, accusing Congress of undermining national security and siding with Pakistan, warning the public will punish them.
Web Summary : एकनाथ शिंदे ने 'ऑपरेशन सिंदूर' पर सवाल उठाने के लिए कांग्रेस की आलोचना की, इसे पाकिस्तान समर्थक और देशद्रोही बताया। उन्होंने सेना की कार्रवाई और पीएम मोदी के रुख का बचाव किया, कांग्रेस पर राष्ट्रीय सुरक्षा को कमजोर करने और पाकिस्तान का साथ देने का आरोप लगाया, चेतावनी दी कि जनता उन्हें दंडित करेगी।