शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

“बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 15:16 IST

DCM Eknath Shinde News: सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

DCM Eknath Shinde News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली असली, तरी पक्षाला लागत असलेली गळती सुरूच असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांनी ठाकरे गटाची स्वबळाची भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, त्यापेक्षा बाळासाहेबांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आता २०२६ मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनावेळी जे सरकार असेल त्याचे ते श्रेय असेल. त्यावेळी जे पंतप्रधान असतील त्यांना आमंत्रित करू. तसेच एनडीए शिल्लक राहिली तर त्यांच्या नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. 

बाळासाहेबांचे स्मारक कुणाच्या मालकीचे नाही

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे ते म्हणाले. अरे कार्यक्रम कुणाचा आहे? बाळासाहेबांचे स्मारक कोण बांधत आहे? सरकार बांधत आहे. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना तुरंगात टाकण्याचे प्रयत्न केले. जून काय काय बोलले मी ते सांगू शकत नाही. पण आता पाहा काय बदल झाला? काय जादू झाली? सरडे रंग बदलतात. पण एवढे वेगाने रंग बदलणारे सरडे पाहिले नाहीत, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना