शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हो, ही मंडळी 'ईडी'मुळेच आली, 'ईडी' म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र; फडणवीसांची जोरदार 'बॅटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 13:15 IST

हनुमान चालिसा म्हटलं की घर तोडणार. मी तर म्हटलं मी नशीबवान आहे. रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी घर तोडण्याचा स्कोप नाही, कारण मी सरकारी घरात राहतो - फडणवीस

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला . भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अभिनंदनपर भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. मविआचं सरकार आलं तेव्हाच मी सांगत होतो हे सरकार अनैसर्गिक आहे, हे टिकणार नाही. माझी खूप टिंगल टवाळी झाली.  मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. अनेकांनी टिंगल टवाळी केली. मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. ज्यांनी टिंगल टवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार. माझा बदला एवढाच की मी त्यांना माफ केलं. राजकारणात अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है, असं फडणवीस म्हणाले.

“मगाशी काही लोक इकडच्या लोकांवर ईडी ईडी असं ओरडत होते. होय, हे खरंच आहे. ही मंडळी ईडीमुळेच आलीयेत. पण ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत,” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला. राजकारणात दोन्ही बाजू असतात, एकेका नेत्यावर ३० खटले टाकले. एका खासदारावर केस अशी टाकली की माझी गाडी देवदर्शनाला भाड्यानं नेली आणि पाच हजार रुपये दिले नाही. त्यांच्यावर ४२० ची केस लागली. गिरीश भाऊंवर मोक्का लागणार होता, बरं झालं असतं लागला असता तर, असं म्हणत त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं. 

“हनुमान चालिसा म्हटलं की घर तोडणार. मी तर म्हटलं मी नशीबवान आहे. रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी घर तोडण्याचा स्कोप नाही, कारण मी सरकारी घरात राहतो. नागपूरचं घर पूर्ण नियमांत आहे. या दोन्ही बाजू आहेत. कोणी कोणाबद्दल वाईट लिहू नये. राजकीय लिहिल्यावर पोस्ट टाकल्यावर लोक जेलमध्येमध्ये आहे. दिल्लीमध्ये हुकुमशाही चाललीय असं सांगायचं. महिना महिना जेलमध्ये ठेवतो. हनुमान चालिसाचा कार्यक्रम मागे घेतला, तरी १२ दिवस महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र