शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार अचानक सिल्व्हर ओकवर; बंडानंतर प्रथमच शरद पवारांच्या घरी, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 21:33 IST

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे शरद पवारांच्या घरी आल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामागचे कारणही समोर आले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर आले आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार हे शरद पवारांच्या घरी आल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामागचे कारणही समोर आले आहे. 

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना दुपारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर काही वेळातच शरद पवारही तिथे पोहोचले होते. प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माहिती दिली आहे. प्रतिभा पवार यांच्या हाताशी संबंधीत समस्येवर शस्त्रक्रिया केली जाणार होती. यामुळे त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्याने सांगितले होते.

काकी प्रतिभा पवार यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी अजित पवार सिल्हर ओकवर आल्याचे सांगितले जात आहे. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परंतू, त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की सिल्हर ओकवर त्यांना आणण्यात आले आहे, हे अद्याप समजू शकलेले नाहीय. 

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची काकी आजारी आहे, त्यामुळे ते तिकडे गेले आहेत. यात वेगळा अर्थ घेण्यासारखे काही नाही, असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस