शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 14:27 IST

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या फाईलवर अद्याप राज्यपालांकडून स्वाक्षरी नाही

मुंबई: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम आहे. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कालच राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. त्या भेटीत १२ सदस्यांच्या यादीवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या यादीतील काही नावांवर राज्यपालांना आक्षेप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका नियमाचा संदर्भ देत राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नाव १२ जणांच्या यादीत आहे. 'निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला राज्यपाल आमदार म्हणून नियुक्त करत नाहीत असा नियम असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही तथ्य तपासत आहोत. शहानिशा सुरू आहे. यात जर काही अडचण आली, तर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील,' असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील काही नावांवर आक्षेप; जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार?

संजय राऊत म्हणतात, राज्यपालांवर नक्कीच राजकीय दबावराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर नक्कीच राजकीय दबाव आहे. त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मंत्रिमंडळानं निर्णय घेतला, नावांची शिफारस केली की त्यावर स्वाक्षरी करण्याचं काम राज्यपालांचं आहे. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. ती सकारात्मक झाली आहे. त्यामुळे राज्यपाल १२ जणांचा समावेश असलेल्या यादीवर लवकरच स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी