शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भातील इम्पेरिकल डेटा कधीपर्यंत मिळणार? अजित पवारांनी थेट तारीख सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 13:15 IST

ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सकारात्मक असल्याचे अजित पवार म्हणाले.

सातारा: ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) इम्पेरिकल डेटा केंद्राकडून मिळण्याबाबत राज्य सरकारने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालायाने फेटाळल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकराने याबाबत तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी अजित पवार नायगाव येथे गेले होते. यावेळी पत्रकारांनी ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाबाबत विचारले असता अजित पवार यांनी थेट तारीखच सांगितली.

राज्यातील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहेत. यासंबंधी असणारा इम्पेरिकल डेटा हा दोन महिन्यात मार्च एंडपर्यंत होणे अपेक्षित आहे. यासाठी लागणारा निधी व कर्मचारी वर्ग महाविकास आघाडीने उपलब्ध करुन दिला आहे, तरी मार्चपर्यंत हा इम्पेरिकल डेटा मिळावा, यासाठी आम्ही आग्रह धरणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. 

दोन महिन्यात इम्पेरिकल डेटा देऊ

ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पेरिकल डेटा मार्चपर्यंत गोळा होईल, अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोगाच्या अध्यक्षांना याबाबत विचारले होते, तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत डेटा गोळा करू असे सांगितले होते. दोन्हीही सभागृहाच्या मंजुरीने लागणारा निधी व सर्व स्टाफ महाविकास आघाडीने उपलब्ध करुन दिल्याने आता याविषयी निधीच्या कमतरतेची अडचण दूर झाली. आयोगाने ठरवले तर दोन महिन्यात हे पूर्ण व्हायला हरकत नाही, तरी येत्या दोन महिन्यात हा इम्पेरिकल डेटा देण्यासंबंधी आम्ही आग्रह धरणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

तोपर्यंत निवडणुका घेऊ नका

जोपर्यंत ओबीसी समाजाला लोकप्रतिनिधीची संधी मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असा ठराव महाविकास आघाडीने केला होता. हा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता नसून मध्य प्रदेश व अन्य राज्यांतही आहे. म्हणून केंद्र सरकार याबाबत कायद्यात दुरुस्ती ही करु शकत होते. मात्र, आम्ही असे म्हटले की, याबाबात टोलवाटोलवी करतात, असे बोलले जाते. ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीची इच्छा असल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.  

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणAjit Pawarअजित पवार