शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 22:55 IST

Deputy CM Ajit Pawar News: अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे सांगितले जात आहे. यावरही अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

Deputy CM Ajit Pawar News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मात्र रायगडावर वेगळीच बाब पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. अजित पवारांना डावलले गेले का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 

कार्यक्रमात सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करणार होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे भाषण झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या सगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले गेले. 

रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले

यावर अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसे गेले पाहिजे, यासंदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणे केली. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले, असे अजित पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, अर्थ खात्याच्या फाईल क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली, अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना, मला अमित शाह असे काहीही बोलले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणे बंद करा. सकाळपासून अमित शाह मुंबईला निघेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. स्वत: देवेंद्र फडणवीस हेही सोबत होते, एकनाथ शिंदे देखील होते. एकनाथ शिंदे यांना काही सांगायचे असेल तर आमचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असे अजिबात वाटत नाही. काही असेल तर ते थेट माझ्याशी बोलतील, मुख्यमंत्र्यांशी बोलतील. आम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करतो, त्यातून मार्ग काढतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaigadरायगड