शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न करा”: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:40 IST

Deputy CM Ajit Pawar News: आता आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे, त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Deputy CM Ajit Pawar News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, असे सांगतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

सुमारे ५० गावातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल, असा विचार मांडला होता त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पक्षाचे कार्यकर्ते कामात सक्रीय ठेवले पाहिजे त्या पद्धतीने पक्षाकडून कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घेत असतो, असे अजित पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले. तर, तुम्ही ज्या ताकदीने पक्षप्रवेश करत आहात त्याने आमच्या पक्षाची ताकद अजून वाढणार असून, आता आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024