शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:03 IST

गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-भाजपा यांची जवळीक वाढली आहे.

मुंबई - राज्यात घडलेल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. दुपारी फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची बातमी आहे. अलीकडेच विधानसभा सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनी त्यांना लिहिलेल्या पत्राचं कौतुक करत त्यांचे फोन करून आभार मानल्याचं सांगितले होते. त्याचसोबत लवकरच मी त्यांना भेटायला जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितले. 

त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस हे दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेत घडणाऱ्या या घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

आज रंगशारदा सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते. मात्र मंगळवारी राज ठाकरेंनी पत्रक काढून पावसामुळे हा मेळावा पुढे ढकलत असल्याचं सांगितले. त्यामुळे मनसेचा आजचा मेळावा रद्द झाला. त्यात आज देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होत आहे. त्यामुळे विविध तर्कवितर्क लढवले जातायेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मी राज ठाकरेंना आभार मानण्यासाठी, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटणार आहे त्याचे वेगळे अर्थ काढू नका असं म्हटलं होते. 

मनसेची भाजपा-शिंदे सरकारला साथविधानसभेत मनसेचे एकमेव आमदार असल्याने संख्याबळात वाढ व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून सरकारला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरेंनी यांनीही विनंतीचा मान राखत विधानसभा अध्यक्ष निवडीत आणि सरकारच्या बहुमत चाचणीवेळी मनसेचे १ मत शिंदे-भाजपा सरकारच्या पारड्यात टाकलं होते. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे-भाजपा यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून फडणवीस-राज ठाकरेंमध्ये काय चर्चा होतेय का हे पाहणंही तितकेच महत्त्वाचे आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे