शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील", देवेंद्र फडणवीसांनी वाचाळविरांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 19:11 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना टोला लगावला. कुठल्याही पक्षातील लोकांना वाटते की, आपल्या पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा यात वावगे काही नाही. राष्ट्रवादीतल्यांना वाटू शकते की अजितदादा झाले पाहिजेत. आमच्या पक्षातील लोकांनाही वाटू शकते की भाजपाचा मुख्यमंत्री व्हायला हवा. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी आज अधिकृतपणे महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेंच राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. याबद्दल अजित पवार आणि मला चांगली कल्पना आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाची कोणती चर्चा देखील नाही आणि जे महायुतीतील लोक असं बोलत आहेत त्यांनी संभ्रम करणं टाळावं, असे फडणवीसांनी सांगितले. 

तसेच पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले आहेत, अशा प्रकारची पतंगबाजी अनेकजण करत आहेत. त्यांनी कितीही भविष्यवाणी सांगून संभ्रम निर्माण केला तरी १०, ११ तारखेला आणि ९ तारखेला देखील काहीही होणार नाही. झाला तर विस्तारच होईल आणि तो विस्तार मुख्यमंत्री ठरवतील तेव्हा होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच राहतील, अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते माध्यमांशी बोलत होते.  "महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील"तिन्ही पक्षातील वाद टाळण्यासाठी समन्वय समिती वाचाळविरांची कानघडणी करणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटले, "मला वाटते की, माझे हे वक्तव्य म्हणजे समजणाऱ्याला इशारा पुरेसा आहे. सर्वच जण समजूतदार असून त्यांना इशारा मिळाला आहे. कोणाला असे वाटावे यात गैर काही नाही. पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे आणि वास्तव हे आहे की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील."

निधी वाटपावरून मविआला टोला"मी विधानपरिषदेत देखील सांगितलं की, आता जे शहाणपण शिकवत आहेत त्यांनी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे शहाणपण त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिकवायला हवं होतं. भाजपा आणि सोबतच्या आमदारांना त्यांनी जराही निधी दिला नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना निधी देणार नाही. मी यादी दाखवू शकतो विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळाला आहे. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावं या मताचे आम्ही नाही", अशा शब्दांत फडणवीसांना मविआला टोला लगावला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण