उपनगराध्यक्ष पाटणकर यांचा राजीनामा

By Admin | Updated: June 9, 2016 03:28 IST2016-06-09T03:28:20+5:302016-06-09T03:28:20+5:30

द्धा पाटणकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला.

Deputy Chairman Patankar resigns | उपनगराध्यक्ष पाटणकर यांचा राजीनामा

उपनगराध्यक्ष पाटणकर यांचा राजीनामा


रोहा : रोहे-अष्टमी नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्षा श्रद्धा पाटणकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गेली अनेक दिवस चर्चेत असणाऱ्या या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.
काही महिन्यापूर्वी काही दिवसांकरिता उपनगराध्यक्ष या पदाकरिता श्रद्धा पाटणकर यांची सत्ताधारी राष्ट्रवादीकडून निवड करण्यात आली होती. विरोधी गटाकडून देखील त्यांना जाहीर पाठिंबा देत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या ठराविक मुदतीनंतर पाटणकर यांनी घूमजाव करीत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस वाढली होती. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून हायकमांड यांनी सुतारवाडीत विशेष बैठक घेत त्यांना अनिश्चित काळाकरिता मुदतवाढ दिली. हायकमांडच्या या निर्णयाबद्दल अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु निवडणुका तोंडावर असल्याने पदाधिकाऱ्यांनी याविषयी अधिक चर्चा करणे टाळले.
पाटणकर यांच्या मुदतवाढीमुळे संतप्त महिला नगरसेवकांनी यापुढे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी न लावता एक प्रकारे बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. या भितीपोटी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पाटणकर यांनी मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. पुढील ८-१० दिवसांत नवीन उपनगराध्यक्ष पदाची नेमणूक होणार आहे. या पदासाठी प्राजक्ता चव्हाण, जितेंद्र पडवळ व मानसी दाते यांची नावे चर्चेत आहेत. या निवडीकडेच साऱ्यांचे लक्ष आहे. (वार्ताहर)

Web Title: Deputy Chairman Patankar resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.