पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीने गमावला जीव

By Admin | Updated: February 11, 2017 03:22 IST2017-02-11T03:22:20+5:302017-02-11T03:22:20+5:30

दाम्पत्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुणीला जीव गमवाला लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

Deprived of husband and wife, sister killed | पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीने गमावला जीव

पती-पत्नीच्या भांडणात मेहुणीने गमावला जीव

पाथर्डी (अहमदनगर) : दाम्पत्याचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मेहुणीला जीव गमवाला लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
पती आकाश दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे दोन वर्षांपासून अविदा खरवंडी येथे माहेरी राहात होती. माहेरी अविदा, वडील मंत्र्या, आई कमल गड तांड्यावर राहात होते.
अविदाची बहीण ऊर्मिला बाजीराव भोसले ही १५ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. गुरुवारी आई, वडील पाथर्डी येथे गेले होते. त्या वेळी संध्याकाळी आरोपी आकाश, जयसिंग भोसले, मंगल जयसिंग भोसले, शरप्या भोसले घरी आले आणि अविदाला शिवीगाळ करू लागले. त्या वेळी ऊर्मिलाने शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता आरोपी आकाश याने कुऱ्हाडीने ऊर्मिलाच्या डोक्यावर घाव घातला, तसेच मंगल हिने अविदाच्या बोटाला चावा घेतला, तर अन्य आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ऊर्मिला जागीच ठार झाली. आरडओरड केल्याने चौघेही पळून गेले. या प्रकरणी अविदाच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Deprived of husband and wife, sister killed