डिनर पार्टीमधून आपचे ९१ लाख रुपये जमा
By Admin | Updated: November 28, 2014 17:18 IST2014-11-28T17:17:15+5:302014-11-28T17:18:33+5:30
निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने ९१ लाख रुपये एका रात्रीत जमवले आहेत.

डिनर पार्टीमधून आपचे ९१ लाख रुपये जमा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने ९१ लाख रुपये एका रात्रीत जमवले आहेत. निवडणूका लढवण्यासाठी आम आदमी पक्षाने मागील निवडणुकांचे तंत्र वापरत यंदाही डिनर पार्टी आयोजित करत जनतेकडून पैसे जमवण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या डिनरपार्टीतून आपने ९१ लाख रुपये जमवले असल्याचे आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी असे सांगितले आहे. या पार्टिमध्ये आमच्या पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणात आले असून डिनर पार्टीच्या पास मधून आम्ही ३६ लाख रुपये जमवले असून ३६ लाख रुपये हे चेक द्वारे वर्गणी म्हणून देण्यात आले आहेत. तसेच २१ लाख रुपये आमच्या कार्यकर्त्यांकडून जमवण्यात आले असल्याचे प्रिती शर्मा मेनन यांनी सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या डिनरपार्टीमध्ये २०० जणांसाठी जागा होत्या. प्रत्येक ताटाची किंमत २० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती. आपच्या वर्गणीदारांमध्ये युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात असून हिरे व्यापारी, सिने दिग्दर्शकांचाही सामावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपचे सर्वाधिक वर्गणीदार महाराष्ट्रात असून त्याखालोखाल दिल्ली व उत्तर प्रदेशातील जनता आपची मोठ्याप्रमाणात वर्गणीदार आहे. महाराष्ट्रातील आपच्या कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिन्यात पाच कोटी रुपये जमवण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
लोकसभा निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत यापुढील वर्गणी जमवण्याची मोहिम बेंगळुरु येथे होणार आहे. या निवडणुकांसाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले असल्याचेही प्रिती मेनन शर्मांनी सांगितले. वर्गणी जमवण्यासाठी भाजपा ज्याप्रमाणे ब्रँड मोदींचा वापर करते त्याप्रमाणे आम्ही ऑनलाइन वर्गणी जमवण्याची नवीन युक्ती शोधली आहे. # (हॅश टॅग) फंड ऑनेस्ट पॉलिटिक्स या नावाने वर्गणी दारांची नावे आपने ट्विटद्वारे जाहीर केली आहेत.