संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान
By Admin | Updated: June 24, 2014 23:24 IST2014-06-24T23:24:54+5:302014-06-24T23:24:54+5:30
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी आज ( मंगळवार ) सासवडवरून उत्साही वातावरणात प्रस्थान झाले.

संत सोपानदेवांच्या पालखीचे प्रस्थान
>सासवड : टाळ-मृदंगाच्या गजरात, ग्यानबा - तुकारामांच्या जयघोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी आज ( मंगळवार ) सासवडवरून उत्साही वातावरणात प्रस्थान झाले.
दर वर्षी अगत्याने हजेरी लावणा:या वरुणराजाने या वर्षी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवली. दुपारी 2.3क्च्या दरम्यान जेजुरी नाक्यावर हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. पालखीचा आज पांगारे या गावी मुक्काम आहे.
दरम्यान, आज ज्येष्ठ वद्य बारस व सोपानदेवांच्या पालखीचा प्रस्थान दिन असल्याने मंदिरात पहाटे 3 वाजता काकडआरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पहाटे 4पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.
सकाळी 11 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम
मानाच्या दिंडय़ांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व दिंडीप्रमुखांचे मानाचे अभंग झाले. याच दरम्यान मानकरी अण्णासाहेब केंजळेमहाराज, देवस्थानचे
प्रमुख गोपाळ गोसावी,
सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील
पालखीमध्ये विधिवत स्थानपन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव
देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँक व सासवड पालिका यांच्या वतीने सर्व दिंडीप्रमुखांचे सत्काराचा कार्यक्रम झाला. सोपानकाका बँकेच्या वतीने या वर्षी प्रत्येक दिंडीसाठी धातूचे तुळशी वृंदावन व दिंडी नामफलक देण्यात आले.
‘माङिाया वडिलाची मिरासिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग’ हा अभंग होऊन दुपारी ठीक 1 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा करून देऊळवाडय़ातून बाहेर पडली. या वेळी हजारो भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. पालखीची सासवडमधून मिरवणूक काढून जेजुरी नाक्यार्पयत आणली. या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखी दर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, संत सोपानकाकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी मंदिरात आमदार विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे व चंदूकाका जगताप , सोपानकाका बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, पंचायत समिती सदस्य दिलीप यादव, सोमेश्वर कारखान्याचे अरुणअप्पा जगताप, डॉ. भारत तांबे, बँक ऑफ इंडियाचे पुणो झोनचे वरिष्ठ अधिकारी, तसेच पंढरपूर, आळंदी, देहू, मुक्ताईनगर, त्रंबकेश्वर आदी ठिकाणच्या देवस्थानांचे प्रतिनिधी व दिंडीप्रमुख, व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
4संत सोपानदेवांच्या पालखीपाठोपाठच चांगा वटेश्वरमहाराजांच्या पालखीचेही काही वेळातच आषाढी वारीसाठी सासवडवरून प्रस्थान झाले. दोन्ही पालख्यांना निरोप देण्यासाठी जेजुरी नाक्यावर नगरध्यक्षा नीलिमा चौखंडे, उपाध्यक्ष अजित जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, सर्व नगरसेवक व हजारो सासवडकर नागरिक उपस्थित होते.