पदोन्नती, आरक्षण निश्चितीचे अधिकार विभागीय आयुक्तांना

By Admin | Updated: May 8, 2015 01:48 IST2015-05-08T01:48:21+5:302015-05-08T01:48:21+5:30

शासनसेवेतील गट-ब व गट अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील पदांवर पदोन्नतीसाठी होणारा विलंब लक्षात घेता बिंदूनामावली प्रमाणीकरण व पदोन्नतीचे

Departmental Commissioners have their right to promotion, reservation | पदोन्नती, आरक्षण निश्चितीचे अधिकार विभागीय आयुक्तांना

पदोन्नती, आरक्षण निश्चितीचे अधिकार विभागीय आयुक्तांना

नागपूर : शासनसेवेतील गट-ब व गट अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील पदांवर पदोन्नतीसाठी होणारा विलंब लक्षात घेता बिंदूनामावली प्रमाणीकरण व पदोन्नतीचे अधिकार व आरक्षण निश्चितीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक ५ मे रोजी काढण्यात आले आहे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी याच मागणीसाठी प्रदीर्घ लढा दिला होता.
वर्ग १ व २ च्या संवर्गांतील पदावर पदोन्नती देण्यासाठी मंत्रालयीन विभागाच्या अधिनस्त सर्व राज्यस्तरीय विभाग प्रमुखांनी सर्व संवर्गांतील रिक्तपदांचा आढावा नियमितरीत्या दर महिन्यात यावा. सर्व गट अ व गट ब संवर्गांची बिंदूनामावली, सेवाप्रवेश नियम, सेवा ज्येष्ठता यादी, मंजूर पदाचा आकृतीबंध व संबधित निवडसूची, रिक्तपदे व निवडसूची अशा प्रकारे वर्षभरातील एकत्रित रिक्तपदे याचा तपशील बिंदू नामावली भरून विभागीय आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. यामुळे पदोन्नतीसाठी होणारा विलंब कमी होणार असून रिक्त पदांवर नियुक्ती करणे सोपे होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून बिंदूनामावलीच्या प्रमाणीकरणाची तपासणी मागासवर्गीय कक्षाने दोन महिन्याच्या आत करावयाची आहे.

Web Title: Departmental Commissioners have their right to promotion, reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.