शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अयोध्या दौऱ्यावरून घमासान; उद्धव ठाकरे यांच्या संवादास संत-महंतांकडून नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:14 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठविलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठविलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.उद्धव यांच्या अयोध्या दौ-यासाठी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, विनायक राऊत, राजन विचारे आदी नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. दरम्यान, साधू-संतांची सर्वांत मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे निमंत्रण धुडकावून लावत प्रभू रामचंद्रांवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आखाड्याशी संबंधित एकही संत सहभागी होणार नाही. या दोन्ही संघटना केवळ प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करत असल्याचा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला.शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेत आखाडा परिषदेने २, ५ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास नरेंद्र गिरी महाराजांनी व्यक्त केला.दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळून लावत सभेसाठी परवानगीच मागितली नसल्याचा दावा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे