सिंचन घोटाळा एफआयआरवर स्थगितीस नकार
By Admin | Updated: April 1, 2016 01:29 IST2016-04-01T01:29:59+5:302016-04-01T01:29:59+5:30
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने नोंदविलेल्या ‘एफआयआर’वर स्थगिती देण्यात यावी व या घोटाळ्यासंदर्भात जनमंच या सामाजिक

सिंचन घोटाळा एफआयआरवर स्थगितीस नकार
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने नोंदविलेल्या ‘एफआयआर’वर स्थगिती देण्यात यावी व या घोटाळ्यासंदर्भात जनमंच या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेत प्रतिवादी करण्यात यावे, अशी विनंती करणारे आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनीचे अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले.
एसीबीने मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्यात कंत्राटदार शाह अँड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी जनमंचच्या जनहित याचिकेत दिवाणी अर्ज सादर करून वरीलप्रमाणे विनंती केली होती.