पंढरीत डेंग्यू सदृश रुग्ण

By Admin | Updated: July 27, 2016 21:42 IST2016-07-27T21:42:06+5:302016-07-27T21:42:06+5:30

पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्‍या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.

Dengue-like patient in the Pandharpur | पंढरीत डेंग्यू सदृश रुग्ण

पंढरीत डेंग्यू सदृश रुग्ण

सचिन कांबळे

पंढरपूर :  पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्‍या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. या तरुणाचे नाव मोहम्मंद रसीद अनसारी (वय 26, रा. मुजफर नगर, उत्तर प्रदेश) आहे.

आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. यामुळे पंढरपूर येथे व्यवसायासाठी देशभरातून छोटे-मोठे व्यापारी येतात.  त्याच पध्दतीने मौत का कुआ असा जीवा बेतनारा चारचाकी व दुचाकी वाहनांचा खेळ घेऊन उत्तर प्रदेशातील काही तरुण पैसे कमविण्याच्या उद्देशाने प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी आले आहेत.

मात्र मौत का कुआमध्ये धाडसाने वाहन चालवणारा मोहम्मंद अनसारी याला ताप आल्याच्या कारणावरुन खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्या ठिकाणी तो डेंग्यू सदृश्य असल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्याला सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यात आल्याची माहीती त्याच्याबरोबर काम करणार्‍या मोहम्मंद अनीस अनसारी यांनी दिली. 

Web Title: Dengue-like patient in the Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.